Vividh Prantiya Masale

अति प्राचीन काळी भारतात मसाल्याच्या पदार्थाचा उपयोग औषधे, तेल, मलम तयार करण्यासाठी केला जात होता . इतकेच नाही तर, मद्याला स्वाद आणण्यासाठी, आंघोळीचे पाणी सुगंधीत करण्यासाठी, शरीरास लेपन करण्यासाठी , शिवाय धूप म्हणूनही मसाल्याच्या पदार्थाचा वापर केला जायचा. मात्र माणसाने मसाल्यांचा वापर खाद्यपदार्थात नेमका कधीपासून केला , याची ठोस माहिती उपलब्ध नाही. रामायणात देखील मसाल्यांचा उल्लेख आढळतो.

मुळत: मसाले हे वनस्पती उत्पादन या प्रकारात मोडतात. काही मसाले हे औषधी गुणाबरोबरच स्वयंपाकातील प्रमुख घटक मानले गेले आहेत. त्यांच्याशिवाय रोजचा स्वयंपाक होणे अशक्यच असते . केवळ भारतातच नव्हे तर, सम्पूर्ण जगात मसाला हा प्रकार खाण्याचे पदार्थ स्वादिष्ट बनवण्यासाठी उपयोगात आणला जातो. अर्थात प्रत्येक देशात त्या त्या वातावरणानुसार वेगवेगळे मसाले आणि त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत . भारतातही प्रांतानुरूप मसाले आणि त्यांचे स्वयंपाकातील स्थान वेगवेगळे आहे. सदर पुस्तकात अनेक प्रांतातील गृहिणींशी बोलून विविध मसाल्याच्या कृती संकलित केल्या आहेत . त्याचा सर्वच गृहिणींना निश्चित उपयोग होईल.

Also Available on.     amazon   

 199.00

SKU: 9789385509506 Categories: ,

Book Details

ISBN

9789385509506

Pages

96

Size

5.5 in x 8.5in

Format

Paperback

About The Author

Manoj Acharya

Manoj Acharya

गेली अडतीस वर्षे  मराठी साहित्य क्षेत्रात  संपादक, चित्रकार, म्हणून कार्यरत. मराठी साहित्य क्षेत्रात तीन हजारांहून अधिक पुस्तकांची मुखपृष्ठे केली आहेत. तसेच  संगीत अभ्यासक  म्हणून शास्त्रीय संगीतविषयक अनेक लेख मासिकात, दिवाळी अंकात प्रकाशित झाले आहेत.

अति प्राचीन काळी भारतात मसाल्याच्या पदार्थाचा उपयोग औषधे, तेल, मलम तयार करण्यासाठी केला जात होता . इतकेच नाही तर, मद्याला स्वाद आणण्यासाठी, आंघोळीचे पाणी सुगंधीत करण्यासाठी, शरीरास लेपन करण्यासाठी , शिवाय धूप म्हणूनही मसाल्याच्या पदार्थाचा वापर केला जायचा. मात्र माणसाने मसाल्यांचा वापर खाद्यपदार्थात नेमका कधीपासून केला , याची ठोस माहिती उपलब्ध नाही. रामायणात देखील मसाल्यांचा उल्लेख आढळतो.

मुळत: मसाले हे वनस्पती उत्पादन या प्रकारात मोडतात. काही मसाले हे औषधी गुणाबरोबरच स्वयंपाकातील प्रमुख घटक मानले गेले आहेत. त्यांच्याशिवाय रोजचा स्वयंपाक होणे अशक्यच असते . केवळ भारतातच नव्हे तर, सम्पूर्ण जगात मसाला हा प्रकार खाण्याचे पदार्थ स्वादिष्ट बनवण्यासाठी उपयोगात आणला जातो. अर्थात प्रत्येक देशात त्या त्या वातावरणानुसार वेगवेगळे मसाले आणि त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत . भारतातही प्रांतानुरूप मसाले आणि त्यांचे स्वयंपाकातील स्थान वेगवेगळे आहे. सदर पुस्तकात अनेक प्रांतातील गृहिणींशी बोलून विविध मसाल्याच्या कृती संकलित केल्या आहेत . त्याचा सर्वच गृहिणींना निश्चित उपयोग होईल.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.