डॉ.प्रतिभा जयंत कणेकर – निवृत्त मराठी विभाग प्रमुख , सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर . त्यांचे ‘परिघावर जगताना’ व ‘कौल उडालेल घर’ हे दोन कथासंग्रह, ‘ लता जाहल्या कल्पतरू ‘ हे व्यक्तचित्रणात्मक पुस्तक आणि ‘वेचलेली अक्षरे’ व कवयित्रीची सर्जनशीलता हे समिक्षाग्रंथ प्रसिद्ध आहेत . त्याशिवाय त्यांचे ‘ पालघर तालुक्यातील बोली ‘ समाज व संस्कृती हे संशोधनात्मक पुस्तक क्षेत्रीय अभ्यासाचे उत्तम नमुना आहे. तर ‘ मराठीतील स्त्री आत्मकथनाची वाटचाल : १९१० ते २०१०’ या ग्रंथाच्या त्यांनी छाया राजे यांच्यासोबत केलेल्या संपादनाची त्यांची दीर्घ प्रस्तावना अभ्यासकांना महत्वपूर्ण वाटली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद , पुणे , ठाणे ग्रंथ संग्रहालय, विलेपार्ले ग्रंथसंग्रहालय व पुणे ग्रंथसंग्रहालय यांचे पुरस्कार त्यांच्या ग्रंथांना लाभले आहे.