Iravati Karve (Bhartiya Manavshastrachya Pranganatil Aadya Deepmal)
डॉ.इरावती कर्वे.पहिल्या भारतीय स्त्री मानव शास्त्रज्ञ! १९२८-३० च्या काळात जर्मनीत जाऊन त्यांनी ‘शारीर मानवशास्त्र’ या विषयात पीएचडी मिळवली आणि आपल्या संशोधनातून तत्कालीन जर्मनीतील वंश श्रेष्ठत्वाच्या सिद्धांतला आव्हान दिले. भारतात परतल्यावर आपल्या ‘शारीर मानवशास्त्रा’ च्या अभ्यासाला त्यांनी ‘सांस्कृतिक मानवशास्त्र’ भारतविद्या, ‘वांशिक-एतिहासिक’ आणि पुरातत्वशास्त्र अशा विविध ज्ञानशाखाची जोड दिली. परिणामी मानवशास्त्राचा त्यांचा अभ्यास बहुपेडी झाला. ‘जात म्हणजे विस्तारित नातेसंबंधांचे वर्तुळ’ अशी जातीची व्याख्या करून जातियुक्त समाजाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी त्यांनी रंगीबेरंगी गोधडीचा दृष्टांत दिला… यातूनच ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ व हिंदू सोसायटी : अँन इंटरप्रिटेशन ‘ हे मौलिक ग्रंथ आकाराला आले. जे आजही जगभरातील मानवशास्त्र – समाज शास्त्राच्या अभ्यासकांकडून अभ्यासले जातात.’मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’, ‘संस्कृती’ या ग्रंथातून त्यांनी मराठी संस्कृतीचा शोध घेतला . तसेच व्याख्याने व वैचारिक लेखामधून नवसमाजरचनेचे प्रारूप उभे केले. एव्हढेच नव्हे तर , शारीर सांस्कृतिक मानवशास्त्र व समाजशास्त्र यात काम करणारी विद्यार्थ्यांची एक पिढी घडवली.
डॉ. इरावती कर्वे म्हटले की चटकन त्यांचे ‘युगांत’ आठवते. त्याशिवाय अनोख्या वाटेवरच्या ललितलेखिका म्हणूनही इरावती कर्वे यांचे नाव आदराने घेतले जाते.परंतु त्यापलीकडे जाऊन ‘भारतातील आद्य स्त्री मानव शास्त्रज्ञ’ ही त्यांची ओळख अधिक ठसठशीत करण्याचा प्रयत्न , म्हणजे त्यांचे हे चरित्र !
Book Release Date 21/01/2025
₹ 450.00
Book Details
ISBN | 9789385509803 |
---|---|
Pages | 314 |
Size | 5.5 in x 8.5 in |
Format | Paperback |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.