Jagtik Darjyache Nivadak 10 Bhautik Shastradnya

थोरामोठ्यांची चरित्रे आपणास नेहमीच प्रेरणा देतात. शास्त्रज्ञांची चरित्रे याला अपवाद नाहीत. जागतिक दर्जाचे अनेक शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्यापैकी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच शास्त्रज्ञांची नावे आपणास माहित आहेत. काही शास्त्रज्ञांचे संशोधन कार्य बहुचर्चित शास्त्रज्ञांच्या संशोधनास तोडीस तोड आहे. परंतु दुर्दैवाने ते दुलर्क्षित राहिले आहेत. त्या शास्त्रज्ञांचा परिचय वाचकांना व्हावा, हा या पुस्तक लेखनाचा उद्धेश आहे. या पुस्तकात शास्त्रज्ञांची चरित्रे रेखाटत असताना १७ व्या शतकापासून ते आजपर्यंत झालेल्या विज्ञानाच्या प्रगतीचा पट उलगडला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक दर्जाच्या निवडक शास्त्रज्ञांमध्ये भारतीय शास्त्रज्ञांचाही समावेश आहे ही अभिमानास्पद बाब आहे. परंतु त्यांची नावे बहतेक वाचकांना माहित नाहीत हे एक वास्तव आहे. त्या भारतीय शास्त्रज्ञांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय या पुस्तकातून वाचकांना होईल. हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, पालक, संशोधक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, विज्ञानप्रेमी नागरिक यांना अत्यंत उपयुक्त आहे. या पुस्तकाला सुजाण, अभ्यासू व रसिक वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल असा मला विश्वास वाटतो.

Also Available on  Amazon Logo PNGs for Free Download

 250.00

SKU: 9789385509841 Categories: ,

Book Details

ISBN

9789385509841

Pages

116

Size

5.5 in x 8.5 in

Format

Paperback

About The Author

Prof. Dr.Sunil Vibhute

प्रा. डॉ. सुनील विभुते एक प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आहेत. विविध वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके इत्यादीतून विज्ञान विषयावर ३००हून अधिक लेखांचे लेखन केले आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या दोन पुस्तकांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व भारताच्या पहिल्या कम्प्युटरचे निर्माते, पद्मभूषण पुरस्कार प्राप्त आदरणीय डॉ. विजय भटकर यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांच्या एका पुस्तकाला प्रसिद्ध शास्त्रज्ञ व पद्मभूषण प्राप्त आदरणीय डॉ. जेष्ठराज जोशी यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांच्या 'विस्मयकारी विज्ञानकथा' या कथासंग्रहातील 'निर्णय' कथा इयत्ता १० वी मराठी विषयाच्या कुमारभारती पाठयपुस्तकात समाविष्ट केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एम. ए. भाग - १ च्या अभ्यासक्रमात लेखकाच्या 'मिरॅकल' या विज्ञानकथा संग्रहाचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेतील डेट्राईट शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या 'निनाद' या जागतिक दिवाळी अंकातर्फे सन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या जागतिक कथा स्पर्धेत लेखकाच्या 'ऑक्सिडीग्रेड' या विज्ञानकथेला जागतिक उत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला आहे.
आकाशवाणी पुणे, सोलापूर, धाराशिव, कोल्हापूर केंद्रावरुन पर्यावरण, प्रदूषण व विविध वैज्ञानिक विषयावर १५० हून अधिक व्याख्यांनाचे प्रसारण झाले आहे. लेखकाचे 'story museum sunil vibhute' हे यु टयुब चॅनल असून त्याद्वारे विज्ञानातील मनोरंजक कथा व माहिती यांचे प्रसारण केले जाते. मराठी विज्ञान परिषद, मुंबई, मराठी साहित्य परिषद, पुणे, इंडियन फिजिक्स असोशिएशन, पुणे, साहित्य संस्कृती अकादमी पुणे, साहित्य विहार संस्था, नागपूर, कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय, नाशिक अशा विविध नामांकित संस्थांचे ४५ पुरस्कार लेखकाला मिळाले आहेत.

 

 

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.