एखाद्या अद्भुतरम्य कथेप्रमाणे उलगडत जाणाऱ्या मानवी आयुष्यात ‘स्वप्न’ हा एक महत्वाचा घटक असतो। बहुतेक स्वप्ने ही जरी निद्रावस्थेत मिटल्या डोळी पडत असली तरी, जागृतावस्थेत उघड्या डोळीही माणसे स्वप्न बघतात। उघड्या डोळी बघितल्या गेलेल्या स्वप्नांमुळे आणि ती साकार करण्यासाठी केलेल्या अथक प्रायत्नांमुळे जीवनाला एक नवा अर्थ प्राप्त होतो। तसेच निद्राधीन अवस्थेत पाहिल्या गेलेल्या स्वप्नांनाही जीवनाला एक आगळे वेगळे परिणाम लाभू शकते। स्वप्न हे कोणत्याही व्यक्तीला कुठल्याही काळी पडत असल्याने, त्या स्वप्नांद्वारे मानवी जीवनाचे गूढ उकळण्याचा प्रयत्न विचारवंतांकडून सातत्याने केले गेलेला आढळतो।जगाच्या पाठीवर सर्वत्र, मानवाला पडणाऱ्या स्वप्नांची आणि त्या स्वप्न फलांबाबतची मीमांसा केली गेलेली आढळते। ज्योतिषशास्त्रही याला अपवाद नाही। स्वप्न कोणत्या प्रहरी पडले, स्वप्नात कोणते दृश्य दिसले, यावरून ज्योतिषशास्त्रात शुभ आणि अशुभ स्वप्ने असे स्वप्नांचे वर्गीकरण केलेले आपल्याला आढळते।तसेच अशुभ स्वप्न फलाची तीव्रता कमी व्हावी, यासंबंधी उपायही ज्योतिषशत्रात सांगितलेले आहेत।
विजया जोशी या नामवंत ज्योतिष तज्ज्ञ आहेत। त्यांनी ज्योतिषशास्त्राविषयी विपुल लेखन केले आहे।
Reviews
There are no reviews yet.