मुंबई आणि विशेषतः जुनी मुंबई हा माझ्या विशेष अभ्यासाचा विषय, त्याच्यासाठी तयारी करताना, ३०० वर्षांपूर्वीच्या काळात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुंबई बंदर आणि हे शहर कसं विकसित केलं असेल, याची कल्पना करूनच माझी छाती दडपुन जाई.त्यांच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटत राही. या भावनेतून मुंबईवर लिहिताना काहीतरी कुठेतरी अपूर्ण आहे अशी भावना मनात टोचत राहिली. मग मी विविध प्रकारे मुंबईचा इतिहास, जडण-घडण आणि विकासाचा कसून अभ्यास केला . जुन्या मुंबईवरील लेख, प्रबंध आणि पुस्तकं अभ्यासली. त्यानंतर काही लेख वृत्तपत्रआणि साप्ताहिकात लिहिले. त्याचं फ्लस्वरूप म्हणजे हे पुस्तकं. मुंबईच्या ऋनातून उतराई होण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न वाचकांना पसंत पडेल.
Also Available on Amazon.
Reviews
There are no reviews yet.