अति प्राचीन काळी भारतात मसाल्याच्या पदार्थाचा उपयोग औषधे, तेल, मलम तयार करण्यासाठी केला जात होता . इतकेच नाही तर, मद्याला स्वाद आणण्यासाठी, आंघोळीचे पाणी सुगंधीत करण्यासाठी, शरीरास लेपन करण्यासाठी , शिवाय धूप म्हणूनही मसाल्याच्या पदार्थाचा वापर केला जायचा. मात्र माणसाने मसाल्यांचा वापर खाद्यपदार्थात नेमका कधीपासून केला , याची ठोस माहिती उपलब्ध नाही. रामायणात देखील मसाल्यांचा उल्लेख आढळतो.
मुळत: मसाले हे वनस्पती उत्पादन या प्रकारात मोडतात. काही मसाले हे औषधी गुणाबरोबरच स्वयंपाकातील प्रमुख घटक मानले गेले आहेत. त्यांच्याशिवाय रोजचा स्वयंपाक होणे अशक्यच असते . केवळ भारतातच नव्हे तर, सम्पूर्ण जगात मसाला हा प्रकार खाण्याचे पदार्थ स्वादिष्ट बनवण्यासाठी उपयोगात आणला जातो. अर्थात प्रत्येक देशात त्या त्या वातावरणानुसार वेगवेगळे मसाले आणि त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत . भारतातही प्रांतानुरूप मसाले आणि त्यांचे स्वयंपाकातील स्थान वेगवेगळे आहे. सदर पुस्तकात अनेक प्रांतातील गृहिणींशी बोलून विविध मसाल्याच्या कृती संकलित केल्या आहेत . त्याचा सर्वच गृहिणींना निश्चित उपयोग होईल.
Reviews
There are no reviews yet.